अहमदनगर Live24 , 30 एप्रिल 2020 :- विधान सभेतील विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोकादायक टिपण्णी सोशल मिडीया प्लॅटफॉर्म फेसबुकवर टाकल्याच्या विरोधात लोणी पोलीसांकडे तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे.
यासंदर्भात पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक संजय सोपानराव आहेर यांनी दिलीप बोचे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली.
दिलीप बोचे यांनी फेसबुक युजर अकौंटद्वारे विरोधी पक्षनेते ना.देवेंद्र फडणवीस यांच्या जीवीतास धोका निर्माण होईल आशी आक्षेपार्ह अपमानास्पद व निंदानालस्ती करण्याच्या उद्देशाने पोस्ट केली असल्याने
उपरोक्त व्यक्ती सोशल मिडीयावर आक्षेपार्ह भाष्य करण्यासाठी खटल्यासाठी जबाबदार असल्याने दिलीप बोचे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रार अर्जातून पुराव्यांसह केली आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर
- ब्रेकिंग बातम्यांसाठी लाईक करा आमचे फेसबुक पेज
https://www.facebook.com/ahmednagarlive24 - जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews - Ahmednagarlive24 ला फॉलो करा ट्वीटर वर
https://twitter.com/Ahmednagarlive
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®