रावसाहेब दानवे यांच्या ‘त्या’ विधानावर रोहित पवार म्हणाले…

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 11 डिसेंबर 2020 :- केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचा रोहित पवारांनी चांगलाच समाचार घेतला आहे. विरोधी पक्षातले लोक नुसतेच वक्तव्य करतात, त्याला काही आधार नसतो, असा टोला रोहित पवारांनी दानवेंना लगावला आहे.

शेतकरी स्वतःच्या हितासाठी लढत आहेत, जर त्याला तुम्ही भारताच्या बाहेरून पाकिस्तान आणि चीनमधून काही जण येऊन या लोकांना प्रेरित करतात, असं म्हणत असाल, तर तुमची विचारसरणी त्या ठिकाणी तुम्ही दाखवून देता, असं राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले आहेत.

तर याच्या आधी दानवेंनी शेतकऱ्यांविषयी केलेले वक्तव्य लोक विसरले नाहीत आणि आताही ते वक्तव्य करतात की पाकिस्तान आणि चीन यांनी सहकार्य केलं पाहिजे, त्यांची विचारसरणी त्याच लेव्हलची आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.

तर अशा विचारसरणीच्या लोकांना आम्ही राजकीय हेतूतून नाही, तर सर्वसामान्य लोक याला कसे उत्तर देतील हे तुम्हाला बघायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

तसेच अशा लोकांचे वक्तव्य जास्त मनाला लावून कुणीही घेऊ नये, असं माझ्यासारख्याला वाटतं. असं सातत्याने जर सर्वसामान्य लोकांच्या विरोधात हे विरोधक बोलत राहिले, तर आम्हीसुद्धा त्या ठिकाणी शांत राहणार नाही, असा इशारा रोहित पवारांनी दिला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment