मंगल कार्यालयातून दीड लाखाचे दागिने चोरीस !

Published on -

श्रीगोंदा : तालुक्यातील घारगाव येथील अक्षदा लॉन्स मंगल कार्यालयातून दि.१२डिसेंबर रोजी सकाळी दहा ते दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने

शांताबाई कासार या वृद्ध महिलेजवळील कापडी पिशवीला कशाने तरी काप मारून त्यातील १लाख ४७ हजार १६७ रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व पेंडल असे दागिने चोरून नेल्याची घटना घडली आहे.

या चोरीबाबत वृद्ध महिलेचे नातू निशिकांत अशोक वरघुडे र.वरघुडेवस्ती त.राहुरी यांच्या फिर्यादीवरून बेलवंडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe