भंडारदरा जलाशयात मासेमारीसाठी गेलेल्या एकाचा मृत्यू

Published on -

अहमदनगर Live24 ,30 मे 2020 :- भंडारदरा जलाशयात मासेमारीसाठी गेलेल्या श्रावणा सोमा मधे यांचा पाण्यात बुडून मृत्यूू झाला. मृतदेह फुगून पाण्यावर आल्यानंतर हा प्रकार लक्षात आला.

राजूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. बुधवारी सकाळी मधे हे जेवणाचा डबा घेऊन घरातून बाहेर पडले. लाॅकडाऊनमुळे हाताला काहीही काम नसल्याने भंडारदरा जलाशयात मासे पकडून थोडाफार आर्थिक फायदा होईल, या हेतूने ते पाण्यात उतरले.

मात्र, खोलीचा अंदाज त्यांना आला नाही. ते पाण्यात बुडाले. दुपार उलटून गेली, तरी वडील घरी आले नाही म्हणून त्यांचा मुलगा व घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. गुरुवारी मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

This Story First Publish on Ahmednagarlive24.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe