अहमदनगर – कल्याण महामार्गावर बस-कंटेनरच्या अपघातात महाविद्यालयीन तरुणीचा मृत्यू

Published on -

अहमदनगर – नगर कल्याण रोडवर कंटेनर व एसटी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात एसटी बस पलटी झाली असून त्यातील 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असून एका महाविदयालयीन तरुणीचा मृत्यू झाला आहे.

सुचित्रा बडेअसे मृत तरुणीचे नाव आहे कल्याण रोड वरून नगर – पारनेर (MH 40 N 8756) ही बस नगरच्या दिशेने येत होती. दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास बायपास चौकात बस व कंटेरची समोरा-समोर धडक झाली हा अपघात इतका भीषण होता की बस पूर्णपणे उलटी झाली.

दरम्यान अपघाताची माहिती समजताच पोलीसानी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सूरु आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe