श्रीगोंदा :- स्कार्पिओची (एमएच ४२ के ८६२२) आय टेन कारला (एमएच १६ बीएच ४७१०) धडक बसून जयसिंग मरकड या तरुण इंजिनियरचा मृत्यू झाला, तर अन्य व्यक्ती जखमी झाले.
१० नोव्हेंबरला सायंकाळी ५ च्या सुमारास नगर-दौंड रस्त्यावर काष्टीजवळ शिवनेरी पेट्रोल पंपासमोर हा अपघात झाला. मरकड हे काष्टीहून पाचपुतेवाडीकडे जात होते.
स्कार्पिओ चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र माळी करत आहेत.