संगमनेर | मालट्रकची धडक बसून दुचाकीस्वाराचा संगमनेर खुर्द येथे मृत्यू झाला. हारुन शेखलाल बागवान (वय ३७, संगमनेर खुर्द) असे मृताचे नाव आहे.
मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. रमजान ईदच्या आदल्या दिवशी झालेल्या या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

पुण्याकडून संगमनेरकडे भरधाव येत असलेली महिंद्रा लॉजिस्टीक कंपनीच्या मालट्रकची (एनएल ०१ एल १७३५) समाेरून येणाऱ्या दुचाकीस (एमएच १७ बीसी ६४८८) धडक बसली.
अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी मालट्रक ताब्यात घेतला.
- Mumbai News : मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई आणि नवी मुंबई विमानतळ मेट्रोमुळे बदलणार मुंबईचा नकाशा
- अहिल्यानगर जिल्ह्यात होणार्या ‘त्या’ मंत्रिमंडळ बैठकीतून जिल्ह्याच्या अनेक प्रश्नांवर तोडगा निघणार
- श्रीरामपूर भाजपा पदाधिकार्यांच्या निवडीवर वाद, कार्यकर्त्यांचा ‘आत्मक्लेश आंदोलन’चा इशारा
- संत शेख महंमद महाराजांचा इतिहास बदलण्याचा प्रयत्न, काँग्रेसचे नेते घनश्याम शेलार यांचा वंशजावर आरोप
- लाडक्या बहिणींच्या उत्पन्नाची होणार पडताळणी, एवढ्या लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलेचे पैसे राज्य सरकार करणार तात्काळ बंद