अहमदनगर Live24 टीम ,13 जुलै 2020 : नगर- पुणे महामार्गावर पारनेर तालुक्यातील जातेगाव घाटात एक अपघात झाला. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाच मृत्यू झाला आहे.याबाबत संदीप दादाभाऊ गाडीलाकर (रा,पळवे) यांनी फिर्याद दिली आहे.
शनिवार दि.११ जुलै रोजी पहाटे एका आज्ञात वाहनाने जातेगाव घाटातील हाँटेल जंगदब समोर तान्हाजी धोंडीबा शिंदे (वय ३५ रा.मलकापुर जि. उस्मानाबाद) यांना जोराची धडक देऊन जखमी केले.
गाडी चालक आधाराचा फायदा घेत वाहनासह फरार झाला. घटनेची माहिती मिळताच सुपा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
आपघातग्रस्थ व्यक्तीला पारनेर ग्रामीण रुग्णालयात रवाना केले तेथे डॉक्टरांनी त्या व्यक्तीला मृत घोषीत केले. सुपा पोलिसांनी अज्ञात वाहन व वाहकचालका विरुद्ध सदोष मनुष्य वधासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews