पारनेर : तालुक्यातील घाणेगाव परिसरातील पारधी समाजातील लोकांमध्ये जोरदार हाणामारी होऊन एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे.
सुपा पोलीस स्टेशनला शुक्रवारी दिलेल्या फिर्यादीत घटनेतील जखमी अक्षय अर्पण भोसले वय 17 वर्षे याने म्हटले आहे,
मंत्री सिराज चव्हाण (रा. वाघुंडे) उंबर्या लहिन्या काळे, अक्षय उंबर्या काळे, संगड्या उंबर्या काळे, मिथुन उंबर्या काळे आणि अन्य दोन जण रा. घुटेवाडी ता. श्रीगोंदा, गोरख टसाळू भोसले पप्पू गोरख भोसले अन्य 6 ते 7 जण राहणार पांढरेवाडी ता. श्रीगोंदा व बाबूशा मेहर्या काळे रा. लगडवाडी कोळगाव ता. श्रीगोंदा
या सर्वानी बुधवार 13 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी सहा वाजता आमच्या घाणेगाव येथील पालावर येऊन आम्हाला जबर मारहाण केली व आमचे चांदीचे 15 देव घेऊन गेले.
या मारहाणीत माझे आजोबा अर्जुन उर्फ अजगण मुरलीधर काळे वय 65 वर्षे हे गंभीर जखमी झाले होते. त्याचे पाचसहा दिवसांनी निधन झाले. वरील सर्व आरोपी माझ्या आजोबाच्या मृत्यूस कारणीभूत आहेत असे फिर्यादीत म्हटले आहे.
सुपा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्यात मंत्री सिराज चव्हाण व उंबर्या लहिन्या काळे याना अटक केली आहे. उर्वरीत आरोपी फरार आहेत.