अहमदनगर लाईव्ह 24 टीम : विकलेल्या बैलाचे पैसे दिले नाही म्हणून एकाचा दगडाने व काठी डोक्यात घालून खून करण्याचा प्रकार मठपिंप्री, जि.नगर येथे घडला आहे.
याबाबत लक्ष्मण बाबुराव घाडगे, वय ५५, धंदा मजुरी, रा. टाकळसीन, ता. आष्टी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. की, प्रशांत उर्फ परसराम पंडित रोकडे व अर्चना प्रशांत रोकडे दोघे रा. मठपिंप्री, ता. जि. नगर यांनी ३० जानेवारी २०२० रोजी मठपिंप्री येथे रंभाजी यशवंत साळवे, वय ६१, रा. मठपिंप्री याच्याकडे विकलेल्या बैलाच्या पैशाची मागणी केली. ते पैसे देण्यास साळवे याने नकार दिला.
याचा राग येवून प्रशांत रोकडे व अर्चना रोकडे यांनी दगड आणि काठीने रंभाजी साळवे यास बेदम मारहाण करून त्याला जखमी अवस्थेत समाज मंदिरात फेकून दिले.यात त्याचा मृत्यू झाला.
लक्ष्मण घाडगे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी रोकडे दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com