राहुरी : कृषी उत्प्नन बाजार समितीच्या कांदा मोंढ्यावर काल कांद्याच्या २,७०२ गोण्यांची आवक होऊन चांगल्या प्रतिच्या कांद्यास ९००० रूपये भाव मिळाला.
कांद्याचे प्रतवारीनुसार मिळालेले भाव पुढीलप्रमाणे- एक नंबर कांद्यास ७५०० ते ९००० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला असून दोन नंबर कांद्यास ४००० ते ७४९५,

तीन नंबर कांद्यास ५०० ते ३०९५ रुपये तर गोल्टी कांद्यास १००० ते ६००० रुपये भाव मिळाला आहे.