अहमदनगर Live24 टीम ,25 जून 2020 : कोरोना महामारीच्या काळात शिक्षण संस्थांना शाळा महाविद्यालये बंद ठेवण्याबाबत सुचना आहेत व कोरोनाचा फैलाव होवू नये याकरिता विद्यार्थ्यांना शाळा महाविद्यालयात न येता ऑनलाईन वर्ग भरवून शिकवले जात आहे.
या ऑनलाईन वर्गाच्या शिक्षणात अनेक शाळा महाविद्यालये विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासमध्ये उपस्थित राहावे अशी ताकीद देत असून सिलाबस बुडाला तर त्यास विद्यार्थी जबाबदार राहतील असे तोंडी सांगत आहेत .
अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लाससाठी आवश्यक असलेले साधने उपलब्ध नसल्याने शिक्षणाला मुकावे लागत आहे, त्यामुळे शिक्षण विभागाचे आदेश काढून ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे, या मागणीचे निवेदन एमआएम विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष शहानवाज तांबोळी व पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांना दिले आहे.
याप्रसंगी विद्यार्थी आघाड़ी जिल्हा सचिव शाहबाज़ सय्यद, शहर अध्यक्ष सनाउल्लाह खान, ़फैज़ तांबटकर , समद शेख , साहिल शेख ,फरहान सय्यद , फैज़ान शेख आदि उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोना महामारीच्या काळात अगोदरच अनेक पाल्यांच्या पालकांचे रोजगार बुडाले असून त्यांना आर्थिक संकटाना सामोरे जावे लागत असून पालकांचे कंबरडे मोडलेले आहे , ऑनलाईन शिक्षणासाठी विद्यार्थी आपल्या पालकांना मोबाईल,टॅब,लॅपटॉप व ऑनलाईन शिक्षणासाठी आवश्यक असणारे साधने घेण्यासाठी हट्ट करीत आहेत .
जे सधन घरातील विद्यार्थी ऑनलाईन शिक्षण घेत आहेत त्या विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयीच्या समस्या निर्माण होत आहे. सदरील बाब ही गंभीर असून शिक्षणामध्ये ऑनलाईन शिक्षण घेणारे श्रीमंत विद्यार्थी व ऑनलाईन शिक्षणासाठी साधने नसलेेेले गरीब विद्यार्थी असा भेदभाव निर्माण करणारी शिक्षण व्यवस्था तयार होते आहे.
जे विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणाला मुकत आहेत असे विद्यार्थी नैराश्यामध्ये जात आहेत. जाऊन आजारी पडण्याच्या तक्रारी सुद्धा पाहायला भेटत आहेत .
काही शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लास अटेंड केले नाही तर झालेल्या शैक्षणिक नुकसाला विद्यार्थी जबाबदार राहतील असे सांगत आहेत. ज्यामुळे अनेक विद्यार्थी तनावाखाली जगत आहेत. जो पर्यंत सर्व स्तरातील विद्यार्थ्यांना समान शिक्षण उपलब्ध होत नाही व सरकार योग्य ती योजना आखत नाही तो पर्यंत ऑनलाईन शिक्षण तात्काळ बंद करावे. असेही निवेदनात म्हटले आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews