अहमदनगर Live24 टीम, 29 ऑगस्ट 2020 :- राज्यातील सत्ताधारी आघाडी सरकारने जागतिक कोरोना संकट काळात दारूची दुकाने उघडी केलीत, बाजारपेठा उघड्या केल्यात, बाजारात प्रचंड गर्दी, मात्र भक्तांच्या भावना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून मंदिरे बंद ठेवलीत.
मंदिरे सुरू करा या मागणीसाठी शेवगाव येथे भाजपच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. ‘दार उघड उद्धवा, दार उघड’, अशी हाक यावेळी देण्यात आली.
आमदार मोनिका राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली जगदंबा देवी भावीनिमगाव, पावन गणपती मंदिर शेवगाव, बोधेश्वर मंदिर बोधेगाव आदी ठिकाणी घंटानाद आंदोलन करण्यात आले.
भाजप तालुकाध्यक्ष ताराचंद लोंढे, रवींद्र सुरवसे, सचिन वारकड, आशा गरड, भीमराज सागडे, अशोक अहुजा, सुनील रसाने, वाय. डी. कोल्हे, कचरू चोथे, राजेंद्र डमाळे, उदय शिंदे, संदीप खरड, संदीप देशमुख, कासम शेख आदी कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार ते साडेचार महिन्यांपासून राज्यातील मंदिरे आणि सर्व धार्मिक स्थळे बंद करण्यात आली आहे.. परंतु, गेले कित्येक दिवस मंदिरे उघडण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
तरीदेखील राज्य सरकारकडून याची दखल घेतली गेली नसल्याने शनिवारी (दि.29) राज्य शासनाच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर घंटानाद आंदोलन पुकारण्यात आले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved