अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश

अहमदनगर Live24 टीम,26 जुलै 2020 :-  शिर्डीमध्ये साईबाबा संस्थानच्या रुग्णालयात तातडीने कोरोना रुग्णालय सुरु करण्याचे आदेश अहमदनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ देणार आहोत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

साईबाबा संस्थान आणि राज्यशासनाच्या संयुक्त विद्यमाने शिर्डीत कोविड केअर सेंटर उत्तमपणे सुरु आहे. मात्र आता वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर या सेंटरवरच न थांबता कोविड रूग्णालय सुरु करण्याची गरज निर्माण झाली आहे.

दरम्यान, साईसंस्थानने अद्याप कोविड रुग्णालय सुरु न केल्याबद्दल आरोग्यमंत्री टोपे यांनी आश्चर्य व्यक्त केले. याबाबत तातडीने जिल्हाधिकाऱ्यांना सूचना करणार असल्याचेही टोपे म्हणाले.

सध्या शिर्डीतील कोविड केअर सेंटरमध्ये लक्षणे नसलेल्या रुग्णांवर प्राथमिक उपचार करण्यात येतात. मात्र सध्या तालुक्यातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येने दोनशेचा टप्पा पूर्ण केला आहे.

शिर्डीही शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. येथील सेंटरमधून लक्षणे असलेल्या व्यक्तींना लोणी किंवा नगरला पाठविण्यात येते. मात्र सध्या ही दोन्ही ठिकाणे हाऊसफुल आहेत.

नगरला रुग्णांना उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. खासगी रुग्णालयात पैसे मोजूनही हातापाया पडावे लागत आहे. तसेच तेथील उपचारही परवडणारे नाहीत.

त्यामुळे शिर्डीतील कोविड सेंटरचे रुपांतर आता कोविड रुग्णालयामध्ये करण्याची सामाजिक गरज निर्माण झाली आहे.

    • अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा 

[email protected]

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment