अहमदनगर लाईव्ह 24 टीम / अहमदनगर – जिल्हा सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजल्यानंतर निवडणूक पूर्व प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
यात विकास सोसायट्यांचे ठराव घेतले जात असताना बँकेच्या एकूण सहा हजार 44 सभासदांपैकी 2 हजार 685 सभासद हे अक्रियाशील सभासद असल्याचे दिसतंय.
आता या सभासदांना प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध झाल्यानंतर या यादीत त्यांचे नाव नसणार आहे. यादीत नाव नसणाऱ्या सभासदांना पुराव्यासह त्यांची क्रियाशीलता सिद्ध करावी लागणार आहे. असे न केल्यास ते सभासद मतदानाला मुकणार हे नक्की.
पुढील वर्षी साधारणपणे एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेच्या 21 संचालकांच्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. त्यासाठी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने निवडणूक पूर्व प्रक्रिया सुरू केली आहे.
याचाच भाग म्हणून बँकेचे सभासद असणार्या विविध विकास सेवा सोसायट्यांचे ठराव मागविण्यात येत आहे. हे ठराव आल्यानंतर प्रारूप मतदारयादी तयार करून ती प्रसिद्ध करून त्यावर हरकती मागवून त्यानंतर अंतिम मतदारयादी तयार करून ती प्रसिद्ध करण्यात येणार आहे.