अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :- केंद्र आणि राज्य सरकार ‘मुलगी वाचवा, मुलगी शिकवा’ या अभियानावर कोट्यवधींचा खर्च करत असताना जामखेड तालुक्यात कुसडगावात या अभियानाचा फज्जा उडाल्याचं चित्र आहे.
या गावात बाळगव्हाण सासर असलेल्या एका विवाहितेला सतत मुलीच होतात, या कारणातून सासरच्या मंडळींकडून विशेषतः तिच्या नवऱ्याकडून या विवाहितेचा अतोनात छळ करण्यात आला.या छळाला कंटाळून तिने मुलींसह आत्महत्या केली. या घटनेननंतर बाळगव्हाणचे ग्रामस्थ संतप्त झाले असून त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतलाय.
रविवार दि. २ ऑगस्ट २०२० रोजी कुसडगाव येथे एका महिलेसह तिच्या तीन मुलींचे मृतदेह एका विहिरीत आढळून आले. मात्र तरीही स्थानिक प्रशासन योग्य अशी कारवाई करत नाही.एकीकडे अभिनेत्याला आत्महत्या करायला कोणी प्रवृत्त केले. याचा शोध घेण्यासाठी या राज्याचे पुढारी आणि पोलीस प्रशासन वाट्टेल ते करत आहेत.
मात्र जामखेड तालुक्यातल्या या प्रकाराकडे कोणाचेच लक्ष नाही.त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांनी शासन आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांविरुद्ध तीव्र असंतोष व्यक्त केला आहे. ‘आमच्या मुलीची आणि तिच्या लेकींची आत्महत्या झाली नसून हत्या करण्यात आली आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे,
अशी मागणी करत बाळगव्हाणच्या ग्रामस्थांनी आज झालेल्या बैठकीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या बैठकीस मयत मुलीचे वडील वाल्मीक वाघ, शोभा वाघ, भाऊ, उमेश वाघ चुलते बबन वाघ, पोलीस पाटील शंकर गोपळघरे, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल खाडे, संजय गोपळघरे,
सरपंच बाळगव्हण, दादासाहब दाताळ, भाऊ दाताळ, बाबासाहेब गोपालघरे, माजी सरपंच विकास गोपळघरे, ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण गोपाळघरे, अशोक गंगावणे, राष्ट्रवादीचे युवा नेते सचिन शिकारे, भाजपचे तालुका सदस्य सागर सोनवणे, माऊली वाघ, शिवाजी पवार, निलेश पवार, नाना पवार, अंगद पवार, अण्णा पवार आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved