पारनेर तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव! एकाच गावातील तब्बल आठ हजार कोंबड्या केल्या नष्ट?

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:-पारनेर तालुक्यात देखील आता बर्ड फ्लू या आजाराचा शिरकाव झाला असून, तालुक्यातील वासुंदे गावात एकाच शेतकऱ्याच्या तब्बल २ हजार कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत.

याबाबत सविस्तर असे की, पारनेर तालुक्यातील वासंदे येथील शेतकरी तुकाराम गोविंद ठाणगे यांच्या २००० कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने त्या नष्ट करण्याची प्रक्रिया जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रविवारी दुपारी केली.

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन समिती सभापती काशिनाथ दाते जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी एस.के.तुंबारे यांनी रविवारी वासुंदे गावात बर्ड फ्लूची लागण झालेल्या चेमटे यांच्या या कोंबडी शेडला भेट देऊन पाहणी केली.

तसेच या ठिकाणी एक किलोमीटर परिसरात असणाऱ्या शिवाजी पायमोडे यांच्या देखील शेड मधील सहा हजार कोंबड्यांची पिल्ले नष्ट करण्याचा प्रक्रिया चालू केली असून,

यासाठी जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची आठ पथके तैनात करण्यात आलेली आहे. तर तीन महिने एक किलोमीटर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आली असून,

शासकीय अनुदान या शेतकऱ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पारनेर तालुक्यातील वासुंदे गावात ८५०० कोंबड्यांची पिल्ले साथीमुळे नष्ट करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने रविवारी घेण्यात आलेला आहे.

त्यामुळे वासुंदे गावातील पोल्टी चालकांचे धाबे या आजारामुळे दणाणले असून पशुसंवर्धन विभागाच्या सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe