अहमदनगर Live24 टीम,3 ऑगस्ट 2020 :- सध्या अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाने आपला विळखा घट्ट करण्यास सुरवात केली आहे. संगमनेर तालुका तर कोरोनाचा हॉटस्पॉट बनू पाहत आहे.
या तालुक्यातील कारागृहातील 22 कैदी कोरोना बाधीत असल्याचे चार दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. परंतु या कैद्यांकडे आरोग्य व महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे.
या कैद्यांवर कोणतेही उपचार केले जात नसल्याने संतप्त झालेल्या या कैद्यांनी जेवणावर बहिष्कार टाकला आहे. कोरोनाबाधित झालेल्या या कैद्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्याऐवजी पुन्हा कारागृहात ठेवण्यात आले होते.
आरोग्य खात्याने उपाययोजना करण्याची गरज होती मात्र चार दिवसात एकही डॉक्टर कारागृहाकडे फिरकला नाही. याचा निषेध नोंदवण्यासाठी या कैद्यांनी जेवणासाठी आलेल्या डब्यांना हात न लावल्याने जेवणाचे डबे कारागृहाबाहेर तसेच पडून होते.
आम्ही कैद्यांची काळजी घेत असून लवकरच त्यांची रवानगी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कारागृह तथा कोव्हिड सेंटरमध्ये करणार असल्याचे तहसीलदार अमोल निकम यांनी सांगितले.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा