अहमदनगर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजप उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत माजीमंत्री बबनराव पाचपुते व आमदार शिवाजी कर्डिले यांनी खा.दिलीप गांधीना टोमणे मारले.

माजी मंत्री पाचपुते यांनी साकळाईसाठी आपण कसे प्रयत्न केले, याचा पाढा वाचला. मागील सभेत खासदार गांधी यांनी डॉ. विखेंना मतदान करा एवढे म्हटले असते, तरी लोकांनी डोक्यावर घेतले असते, पण मधला घोटाळा तेवढा वाईट झाला, असा टोमणाही त्यांनी खासदार गांधी यांना मारला.


आमदार कर्डिले म्हणाले, खासदार गांधींनी आता हवे तेवढे बोलावे. तुम्हाला कोणी अडवणार नाही. त्यावर सभेत मोठा हशा पिकला.