नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार करणाऱ्यास अटक

Published on -

पारनेर :- लग्नाचे आमिष दाखवून, सोबत काढलेले फोटो आई-वडिलांना दाखवण्याची तसेच नवऱ्याला जिवे मारण्याची धमकी देत

आदिवासी तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याप्रकरणी पोखरी येथील संदीप बन्सी करंजेकर या तरुणाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्हा दाखल झाल्यानंतर पारनेर पोलिसांनी आरोपी संदीप यास अटक केली आहे. मजुरी करणाऱ्या आदिवासी तरुणीची सन २०१७ मध्ये संदीप करंजेकर याच्याशी ओळख झाली होती.

ओळखीनंतर तो तरुणीस वारंवार भेटत असे. तिच्याकडे मोबाइल नसल्याने त्याने तिला सिमकार्डसह मोबाइलही घेऊन दिला होता.

‘मला तुझ्याशी लग्न करायचे आहे,’ असे सांगून तो तिला वारंवार भेटत असे. आठ महिन्यांपूर्वी संदीप पीडित तरुणीस नळावणे (जि. पुणे) येथे घेऊन गेला,

तेथे त्याने तिच्या सोबत फोटो काढले. काही दिवसांनंतर तरुणीचे आई-वडील घरी नसताना संदीप घराबाहेर आला.

मला तुला भेटायचे आहे असे सांगून त्याने तिला शेजारच्या शेतामध्ये बोलवले. तेथे तिच्याकडे तो शरीर सुखाची मागणी करू लागला.

तिने नकार दिल्यानंतर मोबाइलमध्ये काढलेले फोटो दाखवून ते तुझ्या आई-वडिलांना दाखवेल,

अशी धमकी देत तरुणीच्या इच्छेविरोधात संदीप याने अत्याचार केला. त्यानंतर त्याच ठिकाणी वारंवार संदीप याने तरुणीवर अत्याचार केला.

तरुणीने संदीपशी असलेले संबंध तोडल्यानंतर गेल्या मे महिन्यात तरुणीचे लग्न झाले. त्यानंतरही संदीपने तिच्या सासरी जाऊन तिला दुसरा मोबाइल दिला. त्यावर तो तिच्याशी बोलत असे.

संदीप तरुणीच्या मोबाइलवर फोन करून बोलत असे. एकदा त्याने तरुणीच्या पतीस जिवे मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर पतीने तरुणीपासून फारकत घेण्याचा निर्णय घेतला तरुणीस तिच्या गावाकडे पाठवून दिले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News