सेवानिवृत्त शिक्षकाकडून मुख्याध्यापिकेचा विनयभंग

Ahmednagarlive24
Published:

पारनेर :- तालुक्यातील जामगाव येथील हायस्कूलच्या मुख्याध्यापिकेस सेवानिवृत्त शिक्षक हरिभाऊ धोंडिबा मेहेर याने अश्लिल शिवीगाळ करीत विनयभंग केल्याची घटना शक्रवारी सकाळी घडली.

मुख्याध्यापिकेच्या फिर्यादीवरून मेहेर याच्याविरोधात पारनेर पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

जामगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक डी. एम. लंके हे ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाल्यामुळे संस्थेचे सचिव महादू बाबू मेहेर यांनी पीडित मुख्याध्यापिकेची त्या पदावर नियुक्ती केली होती.

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागानेही मुख्याध्यापिकेस तसा आदेश दिला आहे. मुख्याध्यापिकेने पदभार घेतल्यानंतर २८ रोजी शाळेचे नियमित कामकाज सुरू झाल्यानंतर

सकाळी सव्वाअकरा वाजता हरिभाऊ धोंडिबा मेहेर रा. भूषणनगर, केडगाव हा सेवानिवृत्त शिक्षक मुख्याध्यापिकेच्या कार्यालयात आला.

‘तू या खुर्चीवर कशी बसलीस’, अशी विचारणा करून अश्लिल शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच मुख्याध्यापिकेच्या गळयातील अडीच तोळयांचे सोन्याचे मिनीगंठण, कानातील रिंग गहाळ झाली.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment