पारनेर | गेल्या सात महिन्यांपासून अल्पवयीन शाळकरी मुलीवर चाकूचा धाक दाखवून अत्याचार करणाऱ्यास पोलिसांनी अटक करत पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.
पारनेर शहराजवळील उपनगरात ही घटना घडली. सतीश बन्सी उमाप (३५, राहुलनगर) असे आरोपीचे नाव आहे.

अत्याचारीत मुलीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, १२ सप्टेंबर २०१८ रोजी लहान मुलांच्या मंडळाची गणपती बसवण्याची तयारी करत असताना सतीशने तिला आपल्या घरात बोलावून चाकूचा धाक दाखवून अत्याचार केले.
या प्रसंगाचे त्याने छायाचित्रण केले. घडलेला प्रकार कोणाला सांगितला, तर छायाचित्रण परिसरातील मुलांना दाखवेन, अशी धमकी त्याने दिली.
त्यानंतर छायाचित्रण इतरांना दाखवण्याची धमकी देत आरोपी सतीशने गेल्या सात महिन्यांत तिच्यावर दोनदा अत्याचार केले.
हे प्रकार तो स्वत:च्या घरात करत असे. मुलीची मासिक पाळी बंद झाल्यावर आईला संशय आला. चौकशी केल्यानंतर मुलीने आईला घडलेला प्रकार सांगितला.
मुलगी गरोदर असल्याचे आईच्या लक्षात आले. आई व मुलीने पारनेर पोलिस ठाण्यात सतीशच्या विरोधात फिर्याद नोंदवली.
पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन सतीशला अटक केली.विरोधात फिर्याद नोंदवली. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करुन सतीशला अटक केली.
- साईदरबारी महिलेने केलेल्या संकल्पाची पूर्ती! खास इंग्लडहून येत साईचरणी अपर्ण केला तब्बल ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट
- Toyota Vellfire ने केला मोठा रेकॉर्ड, अशी बनली लक्झरी कार बाजाराची राणी!
- Ahilyanagar News : अहिल्यानगरसह अखंड महाराष्ट्राचे दैवत असणाऱ्या ‘या’ मंदिराची वक्फ बोर्डाकडे नोंद
- BIS Bharti 2025: भारतीय मानक ब्युरो अंतर्गत 160 जागांसाठी भरती सुरू; त्वरित अर्ज करा
- Union Bank Of India मध्ये 399 दिवसाच्या एफडी योजनेत अडीच लाखांची गुंतवणूक केल्यास किती रिटर्न मिळणार ?