तलवार हल्ला प्रकरणास वेगळे वळण … त्या तरुणावरही गुन्हा दाखल !

Published on -

पारनेर :-  शहरातील बंडू ऊर्फ सौरभ मते याच्यावरील हल्ला प्रकरणाने वेगळे वळण घेतले. डोक्याला मार लागल्यामुळे गंभीर जखमी झालेला हल्लेखोर संग्राम कावरे याने पोलिसांना दिलेल्या जबाबावरून जखमी सौरभ याच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

१६ नाेव्हेंबरला गणेश व संग्राम कावरे बंधूंनी सौरभवर तलवार व चॉपरने वार केल्याने त्याच्यावर नगरच्या खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. संग्रामचा कोतवाली पोलिसांनी जबाब नोंदवला.

संग्राम व गणेश हे सौरभच्या दुकानापासून पळत जात असताना सौरभने पाठीमागून येत मागील भांडणाचा जाब विचारून संग्रामच्या डोक्यावर प्रहार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यात डोक्यास जखम झाल्याचे संग्रामच्या जबाबात नमूद करण्यात आले आहे. सौरभवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अहमदनगर ब्रेकिंग : भर चौकात तरुणावर तलवारीने हल्ला !

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/11/15/attack-on-youth-in-heavy-squares/

या कारणामुळे झाला त्या तरुणावर तलवारीने हल्ला !

http://wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com/2019/11/16/sword-attack-on-the-young-man-for-this-reason/

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe