कॉलेजच्या विद्यार्थिनीचा पाठलाग,विनयभंग करणाऱ्या तरुणास अटक

Published on -

पारनेर ;- कॉलेजच्या तरुणीच्या प्रेमात पडलेल्या आणि नकार मिळूनही तिचा पाठलाग करणार्या तरुणाला चांगलीच अद्दल घडली आहे,तरुणीच्या तक्रारी नुसार विनय भंगाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर या तरुणास अटक झाली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, पारनेर तालुक्यातील वडनेर भागात राहणा-या एका १६ वर्ष वयाच्या कॉलेज विद्यार्थिनीचा बोलेरो जीपमधून वेळोवेळी इच्छा नसताना पाठलाग करुन मोबाईलवर फोन करुन प्रेमासंबंधी विचारले.

तेव्हा विद्यार्थिनीने तु मला फोन करु नको, असे स्पष्ट सांगितले तेव्हा आरोपी संकेत याने मी तुझ्या आई – वडिलांच्या फोनवर फोन करील व तुझ्या मामा याला सांगेल, अशी धमकी दिली.

तेव्हा विद्यार्थीनीचा मामा संकेत याला समजावून सांगत असताना तू जर माझ्या घरी आला तर मी आत्महत्या करील, अशी धमकी दिली. वेळोवेळी पाठलाग करुन विद्यार्थिनीचा विनयभंग केला.

पिडीत विद्यार्थिनीच्या फिर्यादीवरुन संकेत बाबु इंगळे, रा. निघोज, ता. पारनेर याच्याविरुद्ध पारनेर पोलिसांत भादवि कलम ३५४, (ङ) (१) (२) ५०४, ५०६, पोस्को कायदा कलम ११ सी प्रमाणे गुरनं. ५१२ दाखल करण्यात आला असून संकेत इंगळे याला पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe