पाथर्डी : कोर्टात केलेली केस मागे घे असे म्हटल्याचा राग येवून, चौघांनी एकावर थेट तलवार व चाकूने हल्ला केला. या घटनेत रावसाहेब किसन भराट हे जबर जखमी झाले आहेत. ही घटना पाथर्डी तालुक्यातील तोंडोळी येथे घडली. याप्रकरणी पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तोंडोळी येथील रावसाहेब किसन भराट (वय-५० वर्षे) हे घराच्या ओट्यावर बुधवारी पाच वाजचा बसले होते. यावेळी तेथे नानासाहेब कोंडीबा नवले, किरण नानासाहेब नवले, शिवाजी कोंडीबा नवले, गोविंद शिवाजी नवले हे चौघेजण आले.
तू सकाळी केलेली केस मागे घे असे का म्हणाला, याचा राग येवुन नवले यांनी भराट यांना जाब विचारला.त्यानंतर नानासाहेब नवले याने भराट यांच्या उजव्या पायावर तलवारीने वार केला. किरण नवले याने चाकूने भराट यांच्यावर वार केले.
पोटावर झालेला वार भराट यांनी हातावर झेलल्याने ते गंभीर जखमी झाल.े शिवाजी व गोविंद यांनी मारहाण करत जखमी करुन जिवे मारण्याची धमकी दिली. शनिवारी भराट यांच्या जबाबावरुन खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा पोलिसांनी नोंदविला आहे. यातील चारही संशयीत फरार झाले आहेत.
यातील आरोपींनी भराट यांच्या विरुद्ध पूर्वी तक्रार दाखल केली होती. या घटनेतील संशयीत आरोपी फरार आहेत. सहाय्यक पोलिस निरीक्षक दिलीप राठोड हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.