अहमदनगर Live24 टीम,6 ऑक्टोबर 2020 :- पुणे जिल्ह्यातील दिवे घाटातून मोटारसायकवरुन भावासोबत जात असताना एका मुलीचे कोयत्याचा धाक चौघांनी अपहरण करून पाथर्डी तालुक्यातील तिसगावात आनले.
ही बाब पुणे पोलिसांना समजताच पोलिस तिसगावात दाखल झाले मात्र आरोपींनी त्यांना हुलकावणी दिली. परंतु पाथर्डी पोलिसांना मुलीसह तिला पळवुन आणणाऱ्या चौघांना ताब्यात घेण्यात यश आले. तदनंतर आरोपींना लोणीकाळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. दरम्यान, ही बाब लव्ह जिहाद असल्याचे नागरिकांतून बोलले जात होते.
याबाबत सविसतर असे की, दि.३ आक्टोंबर २०२० रोजी सकाळी साडेसात वाजता अपह्रत तरूणी तिचा चुलतभावासोबत मोटारसायकलवरुन जात असताना दिवे घाटात त्याला स्विप्ट गाडी व एका मोटारसायकलवरुन आलेल्या चौघांनी अडविले. कोयत्याचा धाक दाखवुन मुलीला गाडीत बसवुन पळवुन नेले.
याबाबत लोणी काळभोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. ज्या मुलाने मुलीला पळविले होते, त्या मुलाचे मामा तिसगावमधे राहत आहेत. मुलगा, मुलगी व त्याचे साथीदार तिसगावमधे आल्याचे पोलिसांना समजले होते. त्यानुसार पुणे ग्रामीणचे पोलिस तिसगावमधे आले.
मात्र त्यांना या चौघांनी हुलकावणी दिली. त्यानंतर रविवारी तिसगाव भागात कर्तव्यावर असणारे पोलिस कर्मचारी आप्पासाहेब वैद्य यांना संबंधित मुलगी व तरूण तिसगावात असल्याची खबऱ्याकडुन माहिती मिळाली. त्यावरुन वैद्य आणि पोलिस हवालदार दळवी पोलिस नाईक सचिन नवगिरे यांनी तिसगाव
येथील बाजार समितीच्या मोकळ्या जागेत जाऊन राहुल मेहत्रे (रा.निलंग.लातुर), अविनाख चौघुले (रा.दौंड), हमजाद पठाण या तिघांना पकडले. त्यांनी दिलेल्या माहितीवरुन अनिस पठाण व अपहरण केलेली मुलगी यांना तिसगाव येथुन ताब्यात घेतले. अधिक तपासाकामी या सर्वांना लोणी काळभोर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved