अहमदनगर :- अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीस दोषी ठरवत जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. व्ही. देशपांडे यांनी १० वर्षे सक्तमजुरी व दहा हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
भगवान विश्वनाथ वाघमारे (६३, ढाकणवाडी, ता. पाथर्डी) असे आरोपीचे नाव आहे. त्यान घरात एकटी असलेल्या पाच वर्षांच्या चिमुकलीला उचलून आणून तिच्यावर अत्याचार केला होता.

ही घटना १ एप्रिल २०१७ रोजी घडली होती. अत्याचार केल्यानंतर चिमुकलीला सोडून देत आरोपीने डोंगराच्या दिशेने पळ काढला होता.
पिडीत मुलीला उपचारासाठी पाथर्डी येथे सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पिडीतेच्या आईने आरोपीच्या विरूध्द पाथर्डी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
सहायक निरीक्षक ए. बी. परदेशी यांनी पिडीतेचा जबाब नोंदवत आरोपीच्या विरोधात न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. फिर्यादी, पंच, पिडीता,
वैद्यकीय अधिकारी, तसेच तपासी अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या. सरकार पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अनिल घोडके यांनी काम पाहीले.