अहमदनगर Live24 टीम, 28 ऑगस्ट 2020 :- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना कामाचा तगडा अनुभव आहे. वयाची ऐंशी गाठली तरी एखाद्या तरुणाला लावेल असे काम ते करतायेत.
त्यांचा आजवरचा अनुभव हा प्रत्यक्ष फिल्डवर केलेल्या कामातून आला आहे. आपल्या अनुभवाच्या जोरावर जागतिक महामारीमुळे आलेल्या संकटातून देशाला आजोबा अर्थात शरद पवार साहेबच वाचवू शकतात. असे मत कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
आ.पवार यांनी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला असून शरद पवार यांनी सहा महिन्यांपूर्वी राज्यात सरकार स्थापन करुन विरोधकांना धक्का दिला. त्यांच्या या ‘पॉवर’फुल दणक्यातून विरोधक अजूनही सावरले नाहीत असेही ते म्हणाले. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये शरद पवारांच्या कामगिरीचा आलेख उलगडून दाखवला आहे.
ते म्हणतात , देशात कोणत्याही ठिकाणी संकटे आली तरी शरद पवार यांनीच निर्णयात्मक भूमिका पार पाडली आहे. आज पर्यंतच्या संकटांचा विचार केला तर हे दिसून येईल उदाहरण द्यायचेच झाले तर राज्यात किल्लारीचा भूकंप झाला, गुजरातमध्ये भूकंप होऊन नैसर्गिक संकट ओढवले,
मुंबईतील बॉम्बस्फोट आदी संकटांचा विचार केला तर पवार साहेबांनी निर्णायक भूमिका पार पाडलीय असे रोहित पवार म्हणाले. हेच कारण की प्रत्येक संकटाच्या वेळी केंद्रात सरकार कोणाचंही असो त्यांनी शरद पवार यांची मदत घेतली आहे. तसेच सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचे काम पवार साहेबानी केले
असून याच कारणामुळे साहेबांच्या भोवती सतत लोकांची गर्दी पहायला मिळते. आज अनंत अडचणी आहेत. विरोधी पक्षाकडून सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले जात आहेत आणि यापुढंही मांडले जातील. पण ते सोडवण्यासाठी सत्ताधाऱ्यांवर दबावही निर्माण करावा लागतो.
असा दबाव निर्माण करण्यासाठी विरोधकांना एकत्रित आणून एक मोठी ताकद उभी करण्याची आपली क्षमता आहे. विरोधी पक्षातील आश्वासक नेता म्हणून आपल्याकडं पाहिलं जातं. म्हणून विरोधकांची एकत्रित मोट बांधण्यासाठी प्रमुख भूमिका आपण घेऊ शकता
आणि आज त्याचीच सर्वाधिक गरज आहे. अशा प्रकारे मोट बांधूनच आपण प्रबळ सत्ताधाऱ्यांशी लढू शकतो, असं एक कार्यकर्ता म्हणून माझ्यासारख्याला वाटतं. असा आ. पवार यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हटले आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved