हैदराबाद – हैदराबादमधील पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून केल्यानंतर अटकेत असलेल्या चारही आरोपींना शुक्रवारी पोलिसांनी चकमकीत ठार केले.
एकीकडे पोलिसांच्या या कारवाईचे कौतुक होत असताना, पोलिसांच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
पोलिसांनी केलेल्या या एन्काउंटाविरोधात शनिवारी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. शुक्रवारी पहाटेच पोलिस चारही आरोपींना घेऊन घटनास्थळी गेले होते.
तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना चौघांनाही गोळ्या घालण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. अॅडव्होकेट सीएस मणी आणि प्रदीप कुमार यादव यांनी हैदराबाद एन्काउंटरविरोधात सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे.
या कारवाईदरम्यान पोलिसांनी कोर्टाने सन २०१४ ला दिलेल्या निर्देशांचे पालन केलेले नाही, असे या याचिकाकर्त्यांनी एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले.
या एकाउंटरमध्ये सहभागी असलेल्या पोलिसांविरोधात एफआयआर करण्याची आवश्यकता असन त्यांच्यावर कारवाई केली जावी असे याचिकेत म्हटले आहे.
या प्रकरणी सुप्रीम कोर्टात सोमवारी सुनावणी होणार आहे. या व्यतिरिक्त, सुप्रीम कोर्टात या प्रकरणाशी संबंधित आणखी एक याचिका करण्यात आली आहे.
ती आहे या एन्काउंटर कारवाईचे समर्थन करणान्या विरोधात. वकील मनोहरलाल शर्मा यांनी ही याचिका केली आहे. त्यांनी मीडियावरदेखील गॅग ऑर्डर चालवण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणाची सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीखाली एसआयटीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. हैदराबाद बलात्कार प्रकरणात ताब्यात घेण्यात आलेले ४ आरोपी पळून जाण्याच्या प्रयत्नांत असताना पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये मारले गेले.
हे आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी त्यांना थांबवण्याचे प्रयत्न केले. मात्र ते पोलिसांच्या आवाहनाला दाद देत नसल्याचे पाहून पोलिसांना अखेर त्यांच्यावर गोळ्या झाडाव्या लागल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
ही घटना शुक्रवारी पहाटे ३ वाजता घडली. पोलिसांच्या कारवाईनंतर देशभरातून सर्वसामान्य नागरिकांनी आनंद व्यक्त करत पोलिसांचे समर्थन केले आहे.
लोकांनी झिंदाबादच्या घोषणा देत पोलिसांवर फुलांचा वर्षाव केला. तथापि, पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. बलात्कार प्रकरणाचा न्याय हा कोर्टातच व्हायला हवा असे अनेकांचे म्हणणे आहे.
राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाची टीम देखील या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हैदराबादमध्ये दाखल झाली आहे. हैदराबादमध्ये एका डॉक्टरवर सामूहिक बलात्कार करून नंतर तिला ठार मारण्याचा या चार आरोपींवर आरोप होते. बलात्कार आणि हत्येच्या या घटनेनंतर संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली आहे.