पेट्रोलपंपावरच ट्रकने घेतला पेट …

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  कोल्हार कारखान्यातून साखर घेऊन निघालेल्या ट्रकचा डिझेल टॅँक पेट्रोलपंपावरच शुक्रवारी सकाळी फुटल्याने ट्रकने पेट घेतला. साखरेची पोती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ट्रकचे अतोनात नुकसान झाले.

सुदैवाने पेट्रोल पंप बचावल्याने मोठी दुर्घटना टळली. ही दुर्घटना नगर-मनमाड रस्त्यावरील कोल्हार येथील उद्योजक अजित कुंकुलोळ यांच्या रिलायन्स कंपनीच्या पेट्रोलपंपावर सकाळी दहाच्या सुमारास घडली.

कर्जत तालुक्यातील अंबालिका साखर कारखान्यातून कोपरगाव येथील गायत्री ट्रान्सपोर्टचा ट्रक (एमपी १४ – जीबी – १४७७) मध्यप्रदेश येथे सुमारे २७ टन साखर घेऊन निघाला होता. राहाता तालुक्यातील कोल्हार येथे डिझेल भरण्यासाठी हा ट्रक रिलायन्स पंपावर थांबला.

पंपापासून अवघ्या तीन ते चार फुटांवर उभ्या असलेल्या ट्रकचा डिझेल टॅँक फुटला. टायर गरम असल्याने ट्रकने पेट घेतला. पंपावरील कामगार व स्थानिकांनी धाव घेत आग शमवण्याचा प्रयत्न केला.

अवघ्या काही मिनिटांंत विखे कारखान्याच्या अग्निशमन दलाचा बंब घटनास्थळी दाखल झाला. कारखान्याचे संचालक स्वप्निल निबे व कामगारांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अर्ध्या तासात आग आटोक्यात आली, परंतु ट्रकचे मोठे नुकसान झाले.

ट्रकमधील काही साखरपोती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. सुदैवाने अवघ्या चार फूट अंतरावर असलेल्या पेट्रोलपंपापर्यंत आग पोहोचली नाही; अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती. सुदैवाने पेट्रोलपंपावरील दुर्घटना टळली.

साखर घेऊन निघालेल्या ट्रकचा डिझेल टॅँक कोल्हार येथील पेट्रोलपंपावर शुक्रवारी फुटल्याने ट्रकने पेट घेतला. साखरेची पोती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. ट्रकचे मोठे नुकसान झाले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment