पारनरे :- तालुक्यातील निघोजच्या फिरोज शेख या तरुणाने त्याच्या लग्न पत्रिकेतून सुजय विखेंसाठी मतं मागितली आहेत.
येत्या 31 मार्च रोजी फिरोज आणि मोसिना या उच्चशिक्षीत जोडप्याचं लग्न होणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपचे अहमदनगरचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांच्यासाठी एक तरुणाने त्याच्या लग्नपत्रिकेतून मतं देण्याची मागणी केली आहे.
लग्नात आहेर नको, पण सुजयला मत द्या, असं स्पष्टपणे शेख कुटुंबाने पत्रिकेत सर्वात शेवटी लिहिलं आहे. ही पत्रिका सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
कॉंग्रेसने आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने तिकीट नाकाराल्यानंतर सुजय विखे यांनी थेट भाजप प्रवेश करून लोकसभेची उमेदवारी मिळविली.
सुजय विखेंचा प्रचार सध्या शिगेला पोहचलाय. जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये जाऊन ते मतदारांशी संवाद साधत आहेत.