भेसळखोरांवर पोलिसांची कारवाई; 30 लाखांचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर Live24 टीम, 1 जानेवारी 2021 :- भेसळखोरीमुळे अनेकदा या गोष्टींचा परिणाम मानवी शरीरावर झालेला दिसून येतो. दरम्यान हि भेसळखोरी रोखण्यासाठी प्रशासन नेहमी सतर्क राहते.

अशाच राहुरी तालुक्यातील एका भेसळखोरी सुरु असलेल्या अड्ड्यावर छापा टाकण्यात आला आहे. या कारवाईमुळे राहुरी तालुक्यातील दूध भेसळ करणार्‍या दूध सम्राटांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबत अधिकी माहिती अशी कि, राहुरी तालुक्यातील चंडकापूर येथील राजेंद्र चांगदेव जरे यांच्या जय भवानी दूध संकलन केंद्रावर नगर येथील अन्न व औषध प्रशासनाने काल (दि.31) सकाळी छापा टाकला.

यावेळी शेजारच्या राहात्या घरात भेसळीसाठी लागणारी अनेक माल, तसेच भेसळयुक्त दूध असा सुमारे 30 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

यावेळी भेसळयुक्त दूध तेथेच नष्ट करण्यात आले असून व्हे पावडर, लिक्कीड पॅराफीन आदींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून दूध केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला असून दूध संकलन केंद्राला सील ठोकण्यात आले आहे.