पोलिसांना ‘त्या’ महिलेची ओळख पटवण्यात अपयश

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 ,16 जून 2020 :  निंबळक बायपासजवळील लामखडे पेट्रोलपंप परिसरात मृतदेह आढळून आलेल्या महिलेची अद्यापपर्यंत ओळख पटवण्यात यश आले नाही. त्या मुळे या खुनाचे गूढ अद्द्याप कायम आहे.

दि. ७ जून शेजी निंबळक बायपासजवळील काटवनात दुपारी एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला होता. शवविच्छेदन अहवालात ओढणीने गळा दाबल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.

याप्रकरणी पोलीस खंडू लाळणे यांच्या फिर्यादीयरून अज्ञात आरोपी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पात्र, मयत पोलिसांनाअद्यापपर्यंत ओळख पटवण्यात यश आले नाही.

यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाणे हद्दीतील पिंपळगाव माळवी परिसरातील केकताई परिसरात झोपडीत राहणाऱ्या दोन साधूंची जाळून हत्या करण्यात आली होती. या गुन्ह्यातील आरोपींनाही अद्याप पोलिसांना पकडता आलेले नाही. हे हत्याकांड आजही एक रहस्य आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected]

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment