अहमदनगर लाईव्ह 24 टीम : जम्मू-श्रीनगर महामार्गावरील एका टोल प्लाजाजवळ शुक्रवारी सकाळी दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. गोळीबारानंतर दहशतवादी जंगलात पळून गेल्याची माहिती मिळत आहे
Jammu-Srinagar National Highway closed after firing in the area. More details awaited. #JammuAndKashmir (deferred visuals) pic.twitter.com/bUrdJoPuv9
— ANI (@ANI) January 31, 2020
जम्मू-श्रीनगर राजमार्गावर बन्न टोल प्लाजाजवळ पोलिसांकडून श्रीनगरकडे जाणारा एक ट्रक तपासणीसाठी रोखण्यात आला होता. त्यावेळी ट्रकमध्ये बसलेल्या दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरु केला.
J&K Police: Police intercepted a Srinagar bound truck at Bann toll plaza on Jammu-Srinagar highway. Truck bound terrorists fired on police triggering an encounter. One policeman injured, one terrorist killed. (deferred visuals) pic.twitter.com/TYVDWACGi8
— ANI (@ANI) January 31, 2020
या घटनेत एक पोलीस जखमी झाला. तर सुरक्षादलाकडून देण्यात आलेल्या प्रत्युत्तरात एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.मारण्यात आलेल्या दहशतवाद्याकडून एके-४७ आणि ग्रेनेड जप्त करण्यात आला आहे.
सुरक्षादलाकडून चार ते पाच दहशतवाद्यांना घेराव घालण्यात आला आहे. जम्मू-श्रीनगर महामार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. नगरोटा या भागात शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com