अहमदनगर ब्रेकिंग ; हॉटेलमध्ये सुरु असलेल्या अवैध व्यवसायावर पोलिसांचा छापा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 29 जानेवारी 2021 :-राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीपमधील हायप्रोफाइल वेश्या व्यवसायावर पोलिसांनी छापा टाकला आहे.

या छाप्यात दोन पिडीत परप्रांतीय महिलेची सुटका करण्यात आली असून याप्रकरणी एक आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत अधिक माहिती अशी केली,

शुक्रवारी ( दि.२९) रोजी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांना हॉटेल नंदादीप (चिंचोली फाटा ता. राहुरी) हॉटेल चालक सुनिल रामचंद्र हारदे हा पीडित महिलांकडून वेश्याव्यवसाय करुन घेत आहे असे खात्रीशिर बातमी मिळाली होती.

या माहितीवरून हॉटेल नंदादीप चिंचोली फाटा येथे बनावट ग्राहक पाठवून शासकीय पंचासमक्ष छापा टाकण्यात टाकण्यात आला. यावेळी दोन पिडीत परप्रांतीय (बंगाली) महिलांची सुटका केली.

आरोपी सुनिल रामचंद्र हारदे यांस ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपी विरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!