आरोपी बाळ बोठेच्या घरातून पोलिसांनी जप्त केल्या ‘ह्या’ वस्तू !

अहमदनगर Live24 टीम, 05 डिसेंबर 2020 :- यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रेखा भाऊसाहेब जरे यांच्या हत्या प्रकरणाचा छडा पोलिसांनी लावला आहे.

आरोपी बाळ ज. बोठे व सागर भिंगारदिवे या दोघांनी मिळून जरे यांच्या हत्येची सुपारी दिली असल्याचे पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

दरम्यान, त्याच्या बालिकाश्रम रस्त्यावरील राहत्या घराची पोलिसांनी पुन्हा झाडाझडती घेतली. शुक्रवारी दुपारी ही कारवाई करण्यात आली.

त्यात पोलिसांनी बोठे याचा पासपोर्ट, रिव्हॉल्व्हर, मोबाइल, तसेच अन्य काही वस्तू जप्त केल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. अटकेच्या भीतीने फरार झालेल्या बोठे याने स्वतःचे मोबाइल व कार घरीच ठेवले.

तो मित्राच्या कारमध्ये बसून फरार झाला असल्याची पोलिसांची माहिती आहे. पुणे येथे त्याचा शोध घेतला, पण तो सापडला नाही. या प्रकरणातील इतर आरोपी सागर भिंगारदिवे,

फिरोज राजू शेख, ज्ञानेश्वर शिवाजी शिंदे, आदित्य सुधाकर चोळके व ऋषिकेश ऊर्फ टम्या वसंत पवार या पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बोठे हा मात्र अद्याप फरार आहे. त्याच्या शोधासाठी पोलिस पथके रवाना करण्यात आले आहेत. परंतु दोन दिवस उलटूनही बोठे याचा थांगपत्ता लागलेला नाही.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved