कंटेनरने दिलेल्या धडकेत पोलिसाचा मृत्यू

Published on -

केडगाव :- कंटेनरने दिलेल्या धडकेत कर्तव्य बजावणाऱ्या राज्य महामार्ग पोलीस दलातील हवलदार शहाजी भाऊराव हजारे यांचा मृत्यू झाला. 

येथे महामार्ग पोलिस केंद्रात कार्यरत चिचोंडी पाटील येथील पोलिस नाईक शहाजी भाऊराव हजारे (४७) यांचा रविवारी कंटेनरची (आरजे १४ जीएस ७०५५) धडक बसून झालेल्या अपघातात मृत्यू झाला.

ही घटना श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण शिवारात नगर-सोलापूर रस्त्यावर देवनारायण ढाब्यासमोर झाली. अपघातानंतर कंटेनरचालक पळून गेला. एका कर्मचाऱ्याने कंटेनरचा क्रमांक लिहून घेतला होता.

पोलिस कर्मचारी प्रकाश दंदाडे व साठे यांनी अपघातग्रस्त भागात चौकशी करून कंटेनर चालकाचा मोबाइल क्रमांक एका ढाब्यावरून मिळवला.

मोबाइलच्या लोकेशनवरून कंटेनर व चालकाला बाभळेश्वर येथे पकडून पोलिसांनी ताब्यात घेतले.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe