अहमदनगर :- दुष्काळामुळे शेतकऱ्याचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडल्याने त्यांना सरसकट दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी द्यावी. विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी न दिल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा तालुक्यातील बाबुर्डी बेंद येथील ग्रामस्थांनी दिला आहे.
बाबुर्डी बेंद येथे शनिवारी झालेल्या ग्रामसभेत तसा ठराव करण्यात आला आहे. या ग्रामसभेत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी व साकळाई उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्याबाबतचे विषय घेण्यात आले.
मागील तीन-चार वर्षांपासून अत्यल्प पाऊस होत असल्याने रब्बी व खरीप हंगाम वाया गेले आहेत. शेतीसाठी कर्ज काढून केलेला खर्च वाया जात आहे. शेतकरी आर्थिकदृष्ट्या मेटाकुटीला आला आहे. ग्रामीण भागात कर्जबाजारीपणामुळे शेतकरी आत्महत्या करीत आहेत.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी सरकारने सरसकट दीड लाखांपर्यंची कर्जमाफी द्यावी, अशी सूचना निलेश चोभे यांनी मांडली. त्यास सरपंच दिपक साळवे यांनी अनुमोदन दिले. उपसरपंच अण्णा चोभे यांच्यासह सर्वांनीच त्यास पाठिंबा दर्शविला.
- Tata Punch Flex Fuel : पेट्रोल, डिझेल विसरा ! आता SUV चालवा स्वस्त इथेनॉलवर…
- Wipro Share ने गाठला 3 वर्षांचा उच्चांक – गुंतवणूकदार मालामाल होणार ?
- HDFC चा शेअर 2000 पर्यंत जाणार ? मोतीलाल ओसवालने सांगितले पुढचं टार्गेट…
- मोतीलाल ओसवाल कडून मोठा खुलासा ! झोमॅटो शेअर खरेदी करावा कि नाही ?
- Samsung Galaxy S25 Ultra बद्दल सर्व काही ! पहा फीचर्स आणि किंमत…