कर्जत : पंचायत समितीच्या होणाऱ्या सभापती निवडीच्या पूर्वसंध्येला राष्ट्रवादीच्या पंचायत समिती सदस्या साधना कदम यांना गळाला लावून भाजपाने राष्ट्रवादीला सुरुंग लावला.
कर्जत तालुक्यात ना.प्रा. राम शिंदे यांनी पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवून देत राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक केले असून, सभापतीपदावर कोणाची वर्णी लागते याकडे तालुक्याचे लक्ष राहणार आहे.

कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची निवड असून, यावेळी बहुमतातील राष्ट्रवादी बाजी मारून भाजपा कडील पंचायत समितीची सत्ता हस्तगत करणार हे स्पष्ट होते.
मात्र कदम यांनी ना.शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश करत सर्वांनाच धक्का दिला. यावेळी उपनगराध्यक्ष नामदेव राऊत, तालुकाअध्यक्ष अशोक खेडकर,
जिल्हा सरचिटणीस प्रसाद ढोकरीकर, राजेंद्र देशमुख, अमृत लिंगडे, कोरेगावचे सरपंच बापू शेळके, शांतीलाल कोपनर, डॉ.रमेश झरकर,
संपत बावडकर, बापूसाहेब नेटके, डॉ.पंढरीनाथ गोरे, बापूराव ढवळे, पांडुरंग उबाळे, लहू शिंदे, बाळासाहेब बोराटे, आदी उपस्थित होते.
कर्जत पंचायत समितीच्या सभापतीपदाची दि.२० रोजी निवड होणार आहे. सध्याचे पक्षीय बलाबल पाहता राष्ट्रवादी बहुमताच्या जोरावर सभापतीपद मिळविणार अशी जोरदार चर्चा सुरु होती.
पंचायत समितीत भाजपाचे तीन, राष्ट्रवादीचे तीन, शिवसेना एक व अपक्ष एक असे बलाबल होते. मागील वेळी भाजपाच्या शेळके व राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर अश्विनी कानगुडे यांना समान मते मिळाली होती.
व चिठ्ठीद्वारे शेळके या सभापती झाल्या होत्या. मात्र त्याच्या अपात्रतेनंतर भाजप सेनेचे तीन सदस्य, राष्ट्रवादीचे तीन सदस्य, तर अपक्ष एक सदस्या असे बलाबल राहिले होते.
त्यामुळे यावेळी राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर मागच्या वेळी हुकलेली संधी कानगुडे यावेळी साधतील असा अंदाज बांधला जात होता.
मात्र भाजपने राष्ट्रवादीवर सर्जिकल स्ट्राईक करून त्याच्या एका सदस्यालाच आपल्या बाजूला वळवून कर्जत पंचायत समितीची समीकरनेच बदलली.
त्यामुळे राष्ट्रवादीचे सत्ता स्थापनेचे स्वप्न भंगनार का, असा प्रश्न उभा राहीला आहे. ऐन सभापतीपदाच्या निवडीच्या पूर्वसंध्येला ही खेळी खेळून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या तालुक्यातच हादरा दिला आहे.
सध्या राष्ट्रवादीचे रोहित पवार कर्जत जामखेड तालुक्यात जोरदार मोर्चेबांधणी करत असून ना. राम शिंदेना टक्कर देण्यासाठी सरसावले असतानाच भाजपने दिलेला हा धक्का विचार करायला लावणारा आहे.
- Home Loan EMI : पन्नास हजार रुपये पगार असलेल्यांनी घर खरेदी करावं कि भाड्याच्या घरात राहावं जाणून घ्या
- आजपासून शाळांमधील चित्र बदलणार ? राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट
- राहाता येथील श्री नवनाथ मायंबा देव व श्री वीरभद्र देवाच्या यात्रेला डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून प्रारंभ..
- लाडकी बहीण योजना : एप्रिल महिन्याचे पैसे कधी आणि किती मिळणार ? नवी नोंदणी केव्हा सुरु होणार ? जाणून घ्या सर्व प्रश्नांची उत्तर
- WhatsApp Down : जगभरात व्हॉट्सअप अचानक बंद ! मेसेज आणि स्टेटस अपलोड करण्यात अडचण