राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता !

Published on -

अहमदनगर :- राधाकृष्ण विखे पाटील जेव्हापासून विरोधीपक्षनेते झाले तेव्हा पासून त्यांचे भाजपाशी साटंलोटं असल्याचा आरोप त्यांचे बंधू अशोक विखे पाटील यांनी केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील हे प्रवरा मेडिकल ट्रस्टचे उपाध्यक्ष आहेत या ट्रस्ट ला २०१३-१४ मध्ये दोन कोटी रुपये डोनेशन मिळाले.

हे डोनेशन त्यांना झाकीर नाईक नावाच्या अतिरेक्याकडून मिळाल्याचा गौप्य स्फोट राधाकृष्ण् विखे पाटील यांचे बंधू डॉ अशोक विखे पाटील यांनी केला आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याच सख्या भावाने हे खळबळजनक आरोप केल्याने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe