लोकसभा निवडणूक लढवली, तरच माझा प्रपंच चालेल असे नाही – सुजय विखे

Published on -

अहमदनगर :- तुमच्याकडे गाड्या किती आहेत, हे कोणालाही ऐकायचं नाही. गाड्या कशा आल्या, पैसे कुठून आले हे मी आता सांगणार नाही. 

गाड्या हे जर लोकसभेसाठी निकष असतील, तर मीही दहा गाड्या घेतो अशी फिरकी घेत डॉ.सुजय विखे यांनी आ.संग्राम जगताप यांची फिरकी घेतली.

लोकसभा निवडणूक लढवली, तरच माझा प्रपंच चालेल असे नाही. ते म्हणतात, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती अशी ही लढाई आहे. कुणाकडं जनशक्ती आहे? 

शेतकरी आत्महत्या करत असताना जिल्ह्यातील अनेकांना विखे कुटुंबाने दत्तक घेतले. आम्ही खर्च करतो, तुम्ही खर्च केला ते दाखवा, असे डॉ. विखे यांनी यावेळी सांगितले. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe