अहमदनगर Live24 टीम,4 ऑक्टोबर 2020 :-अकोले तालुक्यातील कातळापूर गावातील अनेकांच्या मोबाइलवर अज्ञात व्यक्तींकडून घाणेरडे मेसेज, महिलांचे अश्लिल फोटो येत आहेत. मोबाइल हॅक करून त्यावर मेसेज येत असल्यामुळे गावकरी हैराण झाले आहेत.
घरातील पत्नी, आई, बहीण, मुलगी यांच्याविषयीही अाक्षेपार्ह मेसेज असतात. ग्रामस्थांनी राजूर पोलिस ठाण्यात तक्राप दाखल करण्याचा प्रयत्न केला,
पण पोलीसांनी वाटाण्याच्या अक्षता लावल्याने त्यांनी आपली कैफियत माजी आमदार वैभव पिचड यांच्यासमोर मांडली. पिचड यांनी पोलिसांची कानउघाडणी करत
चौकशी करण्यास सांगितल्यानंतर सपोनि नितीन पाटील यांनी तक्रार दाखल करून चौकशीसाछी सायबर क्राईमकडे पाठवली.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved