वादग्रस्त विधानाबाबत प्रताप सरनाईकांनी नतमस्तक होऊन माफी मागावी

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2020 :- शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या बद्दल अपशब्द वापरल्या बद्दल राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे नरवीर प्रेमींच्या भावना दुखावल्याबद्दल त्यांनी नरवीर तानाजी मालुसरेंप्रती केलेल्या चुकीच्या विधानाबद्दल उमरठ वा सिंहगडला नतमस्तक होऊन माफी मागावी

अन्यथा राज्यात देशात सर्वत्र तीव्र आंदोलनाची भूमिका घेतली जाईल, असा इशारा तानाजी मालुसरे उत्सव समिती चॅरीटेबल ट्रस्ट उमरठचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे रायगड जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत कळंबे यांनी दिला.

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ” मी तानाजी मालुसरे यांच्या सारखा धारातीर्थी पडणारा सैनिक नाही”मी बाळासाहेब ठाकरे यांचा सैनिक आहे.

असे अपशब्द काढले. त्यामुळे कोळी महादेव समाजाच्या भावना दुखावल्या आहे. सरनाईक यांनी त्यांचे वाक्य मागे घ्यावे, अखंड महाराष्ट्रातील मालुसरे परिवार आणि नरवीरप्रेमींनी याठिकाणी या नरवीरभूमीतून संताप व्यक्त करण्यासाठी उपस्थिती दर्शविली, असल्याचे अध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांनी म्हटले आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe
Stay updated!