अहमदनगर Live24 टीम,15 ऑगस्ट 2020 :- भारतात आज 74 वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जात असून यानिमित्त पंतप्रधान मोदी यांनी आज ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून भाषण केले.
यामध्ये त्यांनी, कोरोनावर तसेच शेजारी राष्ट्रांच्या कुरापतींवर आणि इतरही अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले भारतात कोरोनावर लस बनवण्यासाठी शास्त्रज्ञ मेहनत घेत असून तीन लसी चाचणीच्या वेगवेगळया टप्प्यांवर आहेत.
वैज्ञानिकांनी संमती दिल्यावर लसींचे मोठ्या प्रमाणावर निर्माण करून देशभर वितरण करण्यासाठी आराखडा तयार आहे. प्रत्येक भारतीयाला हेल्थ आयडी दिला जाणार असून आजपासून नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन कार्यक्रमाची सुरुवात होत आहे.
कार्डधारकाच्या आजाराविषयी आणि उपचाराविषयी सर्व माहिती या कार्डमध्ये असेल. दहशतवाद तसेच विस्तारवादाचा मुकाबला भारत भक्कमपणे करत असून LOC पासून LAC पर्यंत ज्यांनी देशात्या संप्रुभतेला धोका निर्माण केला, त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर दिले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी याव्यतिरिक्तही अनेक मुद्यांवर भाष्य केले असून यामध्ये अंमलबजावणी केलेल्या विविध योजनांचा दाखलादेखील त्यांनी दिला आहे.
आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved