पोलिसांकडूनच कैद्यांचा पाहुणचार आणि शाही व्यवस्था

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह24 टीम :-  संगमनेरच्या कारागृहात काही पोलिसांकडूनच कैद्यांचा चांगला पाहुणचार ठेवला जात असल्याची धक्कादायक माहिती समजली आहे. कारागृहात बंद असलेल्या कैद्यांना तंबाखू, गुटखा अगदी सहज पोहोचवली जात असून काहींना घरचा डबाही मिळत असल्याचे चित्र पाहावयास मिळते.

संगमनेर पोलीस ठाण्याच्या शेजारीच कारागृह बांधण्यात आले आहे. या कारागृहात एकूण 4 बराकी आहे. एका बराकीत 6 असे 4 बराकीमध्ये 24 कैदी ठेवण्याची क्षमता या कारागृहाची आहे. मात्र क्षमतेपेक्षा नेहमीच जास्त कैदी या कारागृहात पहावयास मिळतात. 

38 कैदी या कारागृहात विविध गुन्ह्याखाली शिक्षा भोगत आहे. या कारागृहात कच्चे कैदी ठेवण्यात येतात. कैद्यांच्या बंदोबस्तासाठी कायम पोलीस तैनात करण्यात आलेले असतात. या पोलिसांवर पोलीस अधिकार्‍यांची नजर असते. कारागृह अधिकारी म्हणून तहसील कार्यालयातील एक अधिकारी काम पाहत आहे.

या कारागृहात विविध गुन्हे केलेले आरोपी शिक्षा भोगत असतात. त्यामुळे त्यांना कैद्यासारखीच वर्तणूक मिळणे अपेक्षित असते. संगमनेरच्या कारागृहात मात्र वेगळे चित्र पहावयास मिळते. या कैद्यांना घरच्यासारखी वागणूक मिळत असल्याचे बोलले जात आहे.

बहुतेक आरोपींना कुठलेना कुठले व्यसन आहे. अशा आरोपींना कारागृहात सहजरीत्या गुटखा, तंबाखूची सुविधा मिळते. काही कैद्यांना तर थेट घरचे जेवण पोहोच होते. या वस्तू कारागृहात नेमक्या जातात तरी कशा असा सवाल विचारला जात आहे.

कारागृहात बंदोबस्तास असलेल्या काही पोलिसांच्या मर्जीमुळेच कैद्यांना वेगवेगळ्या सुविधा मिळत आहे. कैद्यांकडून यासाठी पैसे घेतले जात असल्याची खाजगीत चर्चा होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा [email protected] वर 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment