प्रियंका गांधी बसलेल्या स्कूटी चालकाला झाला इतक्या हजारांचा दंड !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर लाईव्ह 24 टीम / लखनऊ :- प्रियंका गांधी या उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊच्या दौऱ्यावर असताना ज्या स्कूटीवर प्रियंका गांधी बसल्या होत्या त्याच्या चालकास पोलिसांनी चांगलाच दंड ठोठावला आहे. 

शनिवारी प्रियंका गांधी या निवृत्त आयपीएस अधिकारी एस आर दारापुरी यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी निघाल्या. यावेळी पोलिसांनी आपली गाडी रोखल्याचा आरोप प्रियंका यांनी केला.

त्यानंतर प्रियंका गांधी यांनी काँग्रेस कार्यकर्त्याच्या स्कटीवर बसून दारापुरी यांच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाल्या. मात्र, आता याच स्कूटी चालकाला पोलिसांनी दंड ठोठावला असल्याची माहिती समोर आलीय.

 ज्या स्कूटीवर प्रियंका गांधी बसल्या होत्या त्याच्या चालकाने हेल्टमेट परिधान केला नव्हता. तसेच त्याच्याकडे लायसन्स नव्हतं

लखनऊ पोलिसांनी या स्कूटी चालकाला एकूण ६१०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला दंड ठोठावला आहे. 

This Story First Publish on Ahmednagarlive24.com
No1 News Network Of Ahmednagar
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe