अहमदनगर ब्रेकिंग : प्राध्यापक तुकाराम दरेकर यांचे दुःखद निधन !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 4 जुलै 2021 :- प्राध्यापक तुकाराम दरेकर ( श्रीगोंदा ) यांचे आज दुःखद निधन झाले. गेली ९० दिवस ते मृत्यूशी झुंज देत होते, दुर्दैवाने त्यांना वाचविण्यात डॉक्टरांना यश आले नाही. 

श्रीगोंदा तालुक्यातील जेष्ठ राजकीय नेते सर्व विषयांचा अभ्यास असलले नागवडे साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रा. तुकाराम दरेकर( वय 70) यांचे रविवारी सकाळी हदयविकाराच्या झटक्याने पुणे येथे निधन झाले. 

प्रा. तुकाराम दरेकर यांना दोन महिन्यापूर्वी कोरोनाची बाधा झाली होती. तुकाराम दरेकर यांनी कोरोनावर मात केली होती. पण हदयविकाराच्या झटक्याने त्याची प्राणज्योत मालवली. 

प्रा. दरेकर यांचे मागे पत्नी दोन मुले दोन मुली सुना नातवंडे असा परिवार आहे. प्रा. तुकाराम रयत शिक्षण संस्थेत शिपाई पदापासून महाविद्यालयाचे प्राचार्य पदापर्यंत झेप मारली होती. 

प्रा. तुकाराम दरेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू सहकारी होते.प्रा. दरेकर सरांच्या निमित्ताने तालुक्यातील एक अतिशय अभ्यासू नेता आपण गमावला आहे, 

त्यांची उणीव सतत भासत राहील. परमेश्वर त्यांना आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना भावपूर्ण श्रद्धांजली. 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News