वादळी वा-यासह पावसाने हाती आलेल्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम,8 सप्टेंबर 2020 :- वादळी वा-यासह पावसाने हाती आलेल्‍या पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीचे पंचनामे करण्‍याच्‍या सुचना माजीमंत्री आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी महसुल आणि कृषि विभागाच्‍या आधिका-यांना दिल्‍या आहेत.

मागील दोन दिवसात तालुक्‍यात मोठ्या स्‍वरुपात वादळी वा-यासह पाऊस झाला. या पावसाने शेतातील पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्‍ये सोयाबीन, तुर, मुग, ऊस, बाजरी हे हाती आलेले पीक जमिनदोस्‍त झाल्‍याने शेतक-यांवर पुन्‍हा एकदा नैसर्गिक संकट ओढवले आहे.

यापुर्वीही पिकांच्‍या नुकसानीचा सामना शेतक-यांना करावा लागला आहे. पंचनाम्‍याचे अहवाल पाठवुनही शासनाकडुन अद्यापही कोणतीही मदत जाहीर झालेली नाही. आता पुन्‍हा एकदा नैसर्गिक संकट शेतक-यांवर ओढावले असल्‍याचे आ.विखे पाटील म्‍हणाले.

नुकत्‍याच झालेल्‍या पावसापुर्वी सुध्‍दा झालेल्‍या संततधार पावसामुळे अनेक गावातील जमीनींना पाझर फुटल्‍याने पेरणी झालेली पीक सडुन गेली आहेत. अनेक सखल भागात पाणी साठलेले असल्‍याने ऊस, मका आणि घास या पिकांवरही विपरीत परिणाम होवून पिकांच्‍या झालेल्‍या नुकसानीची पाहाणी करुन

या शेतक-यांनाही मदतीची आवश्‍यकता असल्‍याकडे आ.विखे पाटील यांनी लक्ष वेधले आहे. झालेल्‍या पिकांच्‍या नुकसानीचे गांभिर्य आधिवेशना दरम्‍याने कृषि मंत्र्यांच्‍या निदर्शनास आपण आणून दिले असून, शेतक-यांना तातडीने मदत करण्‍याची मागणी केली असल्‍याचे नमुद करुन आ.विखे पाटील म्‍हणाले की,

स्‍थानिक पातळीवर कृषि आणि महसुल विभागाने एकत्रितपणे पंचनामे करुन या नुकसानीचा अहवाल तातडीने शासनाला पाठवावा अशा सुचना आपण आधिका-यांना दिल्‍या असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. तालुक्‍यात कधी कमी तर कधी शास्‍त अशा पावसाच्‍या नैसर्गिक संकटांबरोबरच कोवीड-१९ मुळेही शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

परंतू शेतक-यांच्‍या मदतीच्‍या मागणीकडे महाविकास आघाडी सरकारचे पुर्णत: दुर्लक्ष झाले असून, शेतक-यांच्‍या मदतीसाठी तातडीने निर्णय करण्‍याची मागणी त्‍यांनी केली आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved