हा रॅगिंगचा प्रकार की अन्य काही याचा तपास या औद्योगिक विकास प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांच्या समितीने सुरू केला असून या संबंधीची लेखी तक्रार संस्थेतील एका विद्यार्थ्यासह पालकांनी केली आहे. तर दुसरीकडे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने एक समिती नेमली असल्याची माहिती प्रभारी प्राचार्य जाधव यांनी दिली.
या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वेल्डर या कोर्ससाठी देविभोईरेच्या एका विद्याथ्याने प्रवेश घेतला असून याच कोर्स मधील इतर सहा ते सात विद्यार्थ्यांनी वेळोवेळी अनेक मार्गाने या विद्यार्थ्याला त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. यासंबंधी प्राचार्यासह शिक्षकांना तक्रार केली असता याच सहा ते सात विद्यार्थ्यांनी अनेकवेळा त्याला मारहाण केली असल्याचे पीडित विद्यार्थ्याने सांगितले.
तर दुसरीकडे या प्रकरणाची अधिक शहानिशा करण्यासाठी संबंधित प्राचार्य व शिक्षकांनी या मुलांच्या पालकांना औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत बोलावण्यात आल्याचे सांगितल्याची माहिती प्राचार्य जाधव यांनी दिली.