काॅलेजमधील मुलाच्या त्रासाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

Ahmednagarlive24
Published:

राहुरी :-मुलाच्या त्रासाला कंटाळून १७ वर्षीय विद्यार्थिनीने शनिवारी सकाळी आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना राहुरीत घडली आहे

वैष्णवी कातोरे असे या मृत तरुणीचे नाव असून जोगेश्वरी आखाडा येथील औद्योगिक वसाहतीजवळ कुटुंबाचे वास्तव्य आहे.

त्यांची मुलगी वैष्णवी रवींद्र कातोरे ही राहुरीच्या महाविद्यालयात इयत्ता १२ वी वाणिज्य शाखेत शिक्षण घेत होती.

शनिवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास वैष्णवीने आपल्या राहत्या घरात असलेल्या पंख्याला ओढणी बांधून गळफास घेत आपली जीवन यात्रा संपवली.

राहुरी काॅलेजमधील मुलाच्या त्रासाला कंटाळून वैष्णवीने आत्महत्या केली. या घटनेबाबत राहुरी पोलिसांत आकस्मात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

राहुरी पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक गणेश शेळके पोलिस कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी वैष्णवीचे मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.

वैष्णवीला राहुरी काॅलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याकडून त्रास सुरू असल्याची माहिती नातेवाईकांकडून पुढे आली आहे.

त्रास देणाऱ्या मुलाने Whatsapp च्या माध्यमातून वैष्णवीला संबंधित मुलाकडून त्रास दिला जात होता. या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment